Sunday, 3 May 2015

मनातील काही

खूप दिवसानंतर लिहायला घेत आहे .मनात तसे भरपूर आहे पण थोडक्यात सागतो .मागील २/३ महिन्यापासून कामाचा व्याप खूप झाला.शाळेत मोबाईल व संगणक यावर मुलांना शिकवतांना घरातील माझ्या चिमुकल्या मुलीला वेळ पण देवू शकत नव्हतो .त्यामुळे २/३ महिन्यापासून फक्त शाळा व घरी आलो कि लाडकी सोबत असतो.१८/३/२०१५ ला  पुणे येथे तंत्रज्ञान या विषयी कार्यशाळा झाली.त्याला उपस्थित होतो.तेथे शाळेने आपली जुनी कात टाकून नव्याने तंत्रज्ञानाची साथ घेवून शाळा प्रगतीपथावर न्यावे असे प्रतिपादन मा.नंदकुमार( शिक्षण सचिव) साहेब यांनी केले.तेव्हापासून आम्ही सगळे तंत्रसेन्ही शिक्षक कामाला लागलो.ते आपापले जिल्हातील शाळा  डिजिटल करण्यासाठी .त्यानुसार यवतमाळ जिल्हात हि चळवळ श्री.शफी सर,श्री.कोठेकर सर,श्री.अमित वानखेडे सरव श्री.जीवन जाधव सर पुढे नेण्याचे काम जिल्ह्यातील अनेक तंत्रसेन्ही शिक्षकाच्यासोबत करत आहे. जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा होण्याचा मान हा जी.प.शाळा,यावली हिचा आहे.जिल्ह्यातील मारेगाव,महागाव,उमरखेड,नेर,आर्णी ,पुसद या व इतर तालुक्यात काम चालू आहे. जिल्हात प्रसाद देशपांडे ,फारूक सर,पठाण सर,अमीन चव्हाण सर,विश्वकर्मा सर यासारखे अनेक शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहे.कोणतेही काम करतांना काम करण्यासाठी
प्रेरणा आवश्यक असते आणि ती प्रेरणा देण्याचे काम आमच्या आदरणीय शिक्षणाधिकारी डॉ .सुचेता पाटेकर जी करत आहे.त्याचे काही उपक्रम जिल्हात सुरु आहेत १)शाळेची जाहिरात पोस्टर मधून करणे २)पुस्तक बीसी ३)डिजिटल शाळा .आशा प्रेरणा देण्याऱ्या अधिकार्यांना सलाम.चला  सर्वजन मिळून जी.प. शाळा गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानपूर्ण करू .